Ad will apear here
Next
‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक फायद्याची
शेअर बाजारात सध्या करसवलतीचा फायदा घेण्यासाठी ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’मध्ये (ईएलएसएस) गुंतवणूक हवी. त्यासाठी तीन वर्षांचा लॉक इन पिरियड असला, तरी या तीन वर्षांत गुंतवणूक ७० ते १०० टक्के वाढण्याची शक्यता असते. या मुद्द्यासह शेअर बाजाराच्या सद्यस्थितीनुसार काही गोष्टींची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
......
गेल्या आठवड्यात शेअर बाजार पडलेला होता. पुढील आठवड्यात गुरुवारी महावीर जयंती व शुक्रवारी गुड फ्रायडेमुळे बाजार बंद असणार आहेत. त्यामुळे फक्त तीन दिवसच व्यवहार होत राहतील. शुक्रवारी निर्देशांक ३२ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. निफ्टी नऊ हजार ९९८ अंशांवर थांबला. अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलाद व अन्य वस्तूंवर आयातकर बसवला. त्याचा परिणाम मेक्सिको व चीनवर मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेतील वस्तूंच्या आयातीवर २५ टक्के कर लावला व हा विषय जागतिक व्यापार संघटनेच्या मंचावर नेण्याची धमकीही दिली. दोन प्रबळ अशा या राष्ट्रांच्या साठमारीत भारताला फारसा धक्का बसणार नसला, तरी वातावरण मात्र दूषित झाले आहे, हे स्पष्ट आहे.

त्यातच २८ मार्चला २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपेल व पुढचे आर्थिक वर्ष सुरू होईल. हे वर्ष खळबळीचे ठरणार आहे. व्यापारयुद्ध मोठ्या प्रमाणावर भडकले, तर जगातील सर्व शेअर बाजार त्यात होरपळून निघतील. भारतात येत्या काही महिन्यांत राजस्थान, कर्नाटक, वगैरे राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. १५ एप्रिलनंतर दोन महिने कंपन्यांचे मार्च २०१८ तिमाहीचे व पूर्ण वर्षाचे अलेखापरिक्षित विक्री व नफ्याचे आकडेही प्रसिद्ध होतील. बहुतेक कंपन्यांचे हे आकडे सकारात्मक असतील. तरीही खासगी कंपन्या, गृहवित्त कंपन्या, पोलाद कंपन्या, ग्राफाइट कंपन्या यांचे आकडे जास्त उजवे असतील.

बाजार ज्या वेळेला एकाच बाजूने, मग ती तेजी असो वा मंदी, जात असतो, तेव्हा खरेदी विक्रीबाबत निर्णय घेणे सोपे असते; पण डगमगत्या स्थितीत निर्णय घेणे अवघड असते. त्यातच एप्रिलपासून दीर्घमुदती भांडवली नफ्यावरही १० टक्के कर लागणार असल्याने पुढील तीन दिवस विक्रीचा मारा जोरात राहील. भाव खाली येऊ लागतील. त्यामुळे विक्रीतून येणारी रक्कम पडत्या भावात मिळणाऱ्या चांगल्या शेअर्समध्ये पुढील तीन दिवसांत गुंतवायला हवी. पावसाळा सरला, की सप्टेंबरपासून पुन्हा भाव वाढू लागतील.

शेअर बाजारात सध्या करसवलतीचा फायदा घेण्यासाठी ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’मध्ये (ईएलएसएस) गुंतवणूक हवी. दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम भविष्य निर्वाह निधीत टाकली किंवा ‘ईएलएसएस’मध्ये गुंतवली, तर करदेय रकमेतून वजावट मिळू शकते. ‘ईएलएसएस’मध्ये गुंतवणूक जास्त उत्तम. त्यासाठी तीन वर्षांचा लॉक इन पिरियड असला, तरी या तीन वर्षांत गुंतवणूक ७० ते १०० टक्के वाढण्याची शक्यता असते.

गुंतवणूकयोग्य शेअर :
सध्या मदर्सन सुमी, किवी इंडस्ट्रीज, कंट्रीआय इंडस्ट्रीज, येस बँक यांच्या शेअरचे भाव खूप उतरले आहेत. ‘येस बँके’चा शेअर तर पुढील तीन दिवसांत २६० रुपयांच्या आसपास येईल. या भावात दीर्घ मुदतीसाठी जास्त गुंतवणूक करावी. पुढील तीन वर्षे तो २५ टक्के चक्रवाढ दराने भाववाढ देईल. हेग व ग्राफाइट इंडिया या कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूक अवश्य हवी.

(‘ईएलएसएस फंडां’ची माहिती देणारा लेख वाचण्यासाठी https://goo.gl/XWTMXm येथे क्लिक करा.)


- डॉ. वसंत पटवर्धन
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZMKBM
Similar Posts
टीसीएस, पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर्स घेण्यायोग्य शेअर बाजारात सध्या ‘टीसीएस’च्या उत्तम कामगिरीमुळे संगणन कंपन्यांच्या शेअर्सला अनुकूल वातावरण आहे. पेट्रोलचे भाव चढे राहणार असल्याने पेट्रोलियम कंपन्याही तेजीत आहेत. त्यामुळे सध्या ‘टीसीएस’सह पेट्रोलियम कंपन्या आणि ‘मँगनीज ओअर इंडिया’चे शेअर्स खरेदीसाठी उत्तम आहेत. याविषयी सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात
कंपन्यांचे तिमाही निकाल शेअर खरेदीला अनुकूल सध्या कंपन्यांचे जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होत आहेत. त्याशिवाय रिझर्व्ह बँकेने वाढवलेला रेपो दर, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत राजकीय घडामोडी या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, सध्या कोणते शेअर्स घेण्यायोग्य आहेत, त्याची माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
संपत्तीवाढीचे गणित संपत्ती वाढवायची असेल, तर केवळ बचत करणे पुरेसे नाही. त्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूकही केली पाहिजे. ही गुंतवणूक कशी वाढत जाते, याचे गणित एकदा लक्षात घेतले, की गुंतवणुकीची ताकद लक्षात येते. ‘समृद्धीची वाट’ या सदरात आज पाहू या हे संपत्तीवाढीचे गणित...
हे वर्ष नफा कमावण्याचे... आता पडत्या भावात चांगले शेअर्स घेतले व वर्षभर घायकुतीला न येता ठेवून दिले, तर डिसेंबरअखेर अनेक शेअर्स ३० ते ३५ टक्के वाढ दाखवतील. हे वर्ष नफा कमावण्याचे आहे; मात्र रोज भाव वाढण्याची उत्कंठा दाखवू नये. ग्राफाइट इंडिया, हेग आदी कंपन्यांचे शेअर आत्ता जरूर घ्यावेत. अधिक माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language